तसऱ्याचे वडे

तसऱ्याचे वडे

साहित्य

• ४ वाटी तसऱ्या
• नारळाची अर्धी कवड
• दोन कांदे
• तांदळाचा बारीक रवा
• मिरचीपूड
• १ चमचा हळद
• थोडी चिंच
• २ चमचे कारवारी सांबार मसाला

कृती

• तसऱ्या स्वच्छ धुवून त्यातील मांस काढून घ्या.

• पाणी जास्त असल्यास काढून टाका.

• कांदा बारीक चिरून खवलेला नारळ, मिरचीपूड, हळद, सांबर मसाला एकत्र कालवा.

• त्यात थोडा चिंचेचा कोळ घाला. एक मूठभर रवा घाला.

• लिंबाएवढे गोळे करून रव्यात घोळवून थापा व तव्यावर खोबरेल तेलात घालून भाजा.

• चटणी या सॉससोबत सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.