तवा सब्जी

तवा सब्जी

साहित्य

• बटाटे उकडून त्याचे उभे लांबट जरा पातळ काप करावेत
• ढोबळी मिरची , वांगी
• कारलं , भेंडी
• परवर , फ्लॉवर यासारख्या भाज्या असतील तर त्या उभट ,
• लांबट कापून त्याचे तुकडे करावे ,
• वरच्या भाज्यांच्या प्रमाणात कांदा एकदम बारीक कापलेला
• टोमाटो दोन-तीन किसलेले
• आलं-लसूण पेस्ट
• कांदेही उभे चिरून तुकडे
• पावभाजीचा चाट किंवा गरम मसाला
• हिरवी मिरची पेस्ट तेल (जरा जास्त)
• पनीर असल्यास , चवीपुरतं मीठ

कृती

• प्रत्येकी भाजी तळून घेऊन बाजूला ठेवावी. उरलेल्या तेलात आधी कांद्याचे तुकडे तळून घ्यावेत .

• पनीरही तळून घ्यावं. बाजूला ठेवावं. चिरलेला कांदा एकदम लाल परतून त्यात किसलेले टोमाटो, आलं-लसूण पेस्ट घालावी.

• हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून मीठ टाकावं. व्यवस्थित हलवावं .

• घरात असलेल्या सर्वात मोठया तव्यावर मध्यभागी थोडं तेल टाकून त्यावर हवा असलेला मसाला टाकावा.

• तव्यावर बाजूनं सगळ्या तळलेल्या भाज्या वेगवेळ्या ओळीनं लावाव्यात.

• पानात वाढतेवेळी गैस मोठा ठेवून हवी अस्लेली भाजी मसाल्यात व असलेल्या तेलात बुडवून किंचित तळून गरमगरम वाढावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.