तंदूर कोळंबी – Tandoori Prawns

तंदूर कोळंबी

रेसिपी*

????????‍???? *_आज काय स्पेशल ? तंदूर कोळंबी_*

⏳ *लागणारा वेळ :*

???? ५ मिनिटे

???? *लागणारे जिन्नस:*

????‍♀ कोळंबीचा हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे. तंदूर कोळंबी नुसतं म्हंटल तरी तोंडाला पाणी सुटतं. पटकन साहित्य घ्या.

*१.* पावशेर कोळंबी
*२.* एका लिंबाचा रस
*३.* लाल तिखट १-२ टे.स्पून
*४.* काश्मिरी लाल तिखट १ टे.स्पून
*५.* एक पळी वितळलेले बटर
*६.* आलं पेस्ट १ टे.स्पून
*७.* लसूण पेस्ट १ टे.स्पून
*८.* तंदूर मसाला २ टे.स्पून
*९.* मीठ चवीनुसार
*१०.* अर्धा कांदा उभा चिरून

????‍♀ *क्रमवार पाककृती :*

*१.* कोळंबी स्वच्छ धुवुन घ्या आणि धागा काढुन घ्या.

*२.* लिंबाचा रस, लाल तिखट, काश्मिरी तिखट, आल आणि लसूण पेस्ट, मीठ, तंदूर मसाला आणि बटर चांगले एकजीव करुन घ्या.

*३.* या मिश्रणात कोळंबी मरीनेट करा. कमीत कमी १ तास.

*४.* ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करा १० मिनिटे.

*५.* ट्रे वर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल पसरवा.

*६.* आता फॉईलवर कोळंबी पसरवून ठेवा.

*७.* १८० डिग्रीवर फॅन फोर्स्ड मोडमधे १५-२० मिनिटे ठेवा. दर ५ मिनिटांनी कोळंबीची बाजू बदलत रहा. इथे जरा अंदाजानेच आणि लक्ष ठेवून वेळ किती ते ठरवा.

*८.* कांदा पाण्यात धुवुन घ्या. त्यात मीठ आणि थोडे काश्मिरी तिखट घाला.

*९.* कांदा, लिंबू आणि कोळंबी प्लेटमधे ठेवून सजवा आणि लुटा मस्त आनंद.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.