
छोले
साहित्य
• १ कप काबुली चणे
• १ टेबलस्पून तूप
• २ टीस्पून लसूण पेस्ट
• १ तमाल पत्र , ३-४ लवंगा, १ ” दालचिनीचा तुकडा
• १ कप बारीक चिरलेला/ किसलेला कांदा
• १ टोमॅटो, बारीक चिरून
• १/४ टीस्पून गरम मसाला
• १ १/२ टीस्पून लाल तिखट
• १/४ टीस्पून आमचूर
• १/४ टीस्पून धनेपूड
• १/४ कप चहाचे पाणी (रंग येण्यासाठी)
• मीठ चवीप्रमाणे
• पूर्वतयारी : काबुली चणे ८-९ तास पाण्यात भिजत घाला.
कृती
भिजवलेले छोले कुकरमध्ये थोडे मीठ घालून मऊसर शिजवून घ्या.जास्ती शिट्ट्या केली तर चणे लगदा होतात त्यामुळे अंदाज घेऊन शिट्ट्या करा.
• एकीकडे चहाचे पाणी करून घ्या.
• एका भांड्यात तुप गरम करा. तुपात लवंगा,दालचिनी तमाल पत्र फोडणीला घाला. नंतर लसूण पेस्ट आणि कांदा घाला. खमंग वास सुटला कि टोमॅटो, हळद, तिखट ,गरम मसाला, आमचूर, धनेपूड आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता.
• मुठभर छोले मिक्सरमध्ये घालून बारीक करा आणि ते घालून परता .
• उरलेले छोले घालून परता. चहाचे पाणी घाला.
• आवडीप्रमाणे पाणी घालून पात्तळ करा.थोडावेळ उकळू द्या.
• गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून सजवा.
• गरम गरम भटुरे किंवा पोळी, ब्रेड बरोबर सर्व्ह करा.
टीप : चहाचे पाणी घातल्याने छान रंग येतो आणि चवही छान येते.
घरी पार्टी असेल तर छोले-भटुरे बरोबर व्हेज पुलाव ,व्हेज रायतं आणि गुलाबजाम हे कॉम्बिनेशन छान लागतं.
Leave a Reply