चीझ व भाजीचा पराठा

चीझ व भाजीचा पराठा

साहित्य

• १ कप मैदा
• १ कप कणीक
• ६ टे. स्पून डालडाचे मोहन
• १/४ कप किसलेले चीझ
• १ लहानसा फ्लॉवर
• १ गाजर
• १ वाटी मटारचे दाणे
• १ कांदा
• ३/४ हिरव्या मिरच्या
• लहानसा आल्याचा तुकडा
• २/४ लसूण पाकळ्या
• थोडा पुदिना
• कोथिंबीर

कृती

• सर्व भाज्या किसुन घ्या. मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात.

• नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये.

• नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पूदिना वगैरे घालून मिश्रण ढवळावे, चीझही घालावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.

• पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी.

• फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करुन, मधे सारण पसरुन, कातण्याने कापून परोठे शेकावे. बाजूने तूप सोडावे.

• उलटताना फार जपून व बेताने उलटावेत. हे परोठे चवीला फारच सुंदर लागतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.