चिकन नवाबी

चिकन नवाबी

साहित्य

• १ किलो चिकन
• २ कांदे, १ इंच आले
• १०-१२ लसणाच्या पाकळ्या
• २ हिरव्या मिरच्या
• प्रत्येकी ४ चमचे दही आणि मलई
• अर्धा चमचा केशर
• १ चमचा दूध, कोथिंबीर
• तूप, स्वादानुरूप मीठ

मसाला :

• अर्धा चमचा हळदपूड
• ४-५ हिरवी वेलची
• ५-६ लवंगा
• १ इंच दालचिनी
• १ चमचा खसखस
• अर्धा चमचा जिरे
• २ तमालपत्र

कृती

• चिकन स्वच्छ करून त्याचे तुकडे करा. आले, लसूण वाटून घ्या. कांदे पातळ उभे चिरून घ्या. लवंग, दालचिनी, वेलची, जिरे, खसखस, हळद व लाल मिरच्या मिक्सरमधून वाटून घ्या.

• दूध किंचित गरम करून त्यात केसर घालून ठेवा. पातेल्यात तूप गरम करून त्यात कांदा बदामी रंगाचा होईस्तोवर परतवून घ्या. नंतर त्यात आले-लसणाची पेस्ट घालून दोन मिनीटे परतवा.

• खमंग वास आला की त्यात वाटलेला सुका मसाला आणि तमालपत्र घालून पाच मिनीटे परतवा. नंतर त्यात चिकनचे तुकडे घाला. थोडा वेळ परतवून त्यात गरजेनुसार गरम पाणी घालून पातेल्याला घट्ट झाकण लावून चिकन शिजवत ठेवा. चिकन शिजले की, त्यात दही व मीठ एकत्र फेटून घाला. हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्यात घाला.

• चिकन पूर्ण शिजले की, त्यात केशराचे दूध, मलाई घालून व्यवस्थित एकत्र करा. शेवटी चिकनवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅसवरून खाली उतरवा. चिकन नवाबी गरमागरम रोटीसोबत सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.