
चिकन कोफ्ता करी
साहित्य
• ४५० ग्राम बारीक केलेले चिकन
• १ चमचा आले-लसुन पेस्ट
• १ कांदा, बारीक कापलेला
• १ टोमाटो, प्युरी करून
• १ चमचा गरम मसाला
• लाल तिखट, चवीनुसार
• १ लसुन पाकळी, बारीक चिरून
• १ अंड
• १/२ red bell pepper, बारीक
• ३ वेलच्या
• कोथिम्बिर
• मीठ, चवीनुसार
• हळद
• तेल
• पाणी, गरजेनुसार
• २ चमचे दही
• जीरा पावडर
कृती
• बारीक केलेले चिकन नीट धुऊन घ्या आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्या.
• एका मोठ्या भांड्यात चिकन, आले-लसुन पेस्ट, लाल तिखट, गरम-मसाला, अंड, red bell pepper, मीठ आणि कोथिम्बिर एकत्र करून एकजीव करून घ्या.
• कढई गरम करून त्यात ४-५ चमचे तेल टाका.
• हाताच्या तळव्याला थोडे पाणी लावून घ्या. आणि त्यावर चिकनच्या मिश्रणातील थोडेसे मिश्रण घेऊन गोळा बनवा. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
• कढईतील तेल पुरेसे गरम झाले की चिकनचे गोळे सोडून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
• तळेलेले गोळे बाजूला ठेऊन द्या.
• करी बनवायची कृती:
• खलबत्यात वेलची आणि लसून पाकळ्या ठेचून घ्या.
• मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करून घ्या.
• आता चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
• त्यात हळद, लाल तिखट, जिरे आणि मीठ घालून परता.
• आता टोमाटो प्युरी घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.
• भांड्याला सर्व बाजूने तेल सुटायला लागले कि धणेपूड, गरम मसाला आणि जिरे पावडर घालून मंद आचेवर परतून घ्या.
• आता दही घालून सारखे हलवत रहा.
• मिश्रणात पाणी घालून, झाकण ठेऊन उकळी येऊ द्या.
• चव घेऊन मीठ आणि मसाले बरोबर आहेत का बघा नसतील तर चवीनुसार घाला.
• मंद आचेवर, एक एक कोफ्ता उकळत्या करी मध्ये सोडा.
• कढईवर झाकण ठेऊन कोफ्ते १०-२० मिनिटे शिजवून घ्या.
• २० मिनिटांनी आच बंद करून, करी निट हलवून घ्या.
• बारीक चिरलेल्या कोथिम्बिर ने सजवा.
• गरम-गरम भात, पोळी किंवा चपाती बरोबर वाढा.
Leave a Reply