
चटपटीत रगडा
साहित्य
• सात-आठ पोळ्या
• एक वाटी उकडलेले हरबरे
• दोन बटाटे , टोमाटो
• दोन कांदे , कोथिंबीर
• एक वाटी बारीक शेव
• दोन वाटया दही
• चाट मसाला , तिखट
• पाव वाटी खारे शेंगदाणे
• पाव वाटी कांद्याची पात
• चवीनुसार मीठ .
कृती
• पोळ्यांचे पातळ तुकडे करावेत आणि तेलात खरपूस तळून घ्यावेत . बटाटे उकडून अगदी बारीक करून घ्यावेत .
• कांदा बारीक चिरून घ्यावा . टोमाटो , कोथिंबीर , कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी .
• एका पसरट भांडयात उकडलेले बटाट्याचे बारीक तुकडे , कांदा , कांद्याची पात , थोडी कोथिंबीर , टोमाटो , थोडी शेव एकत्र करावी .
• त्यात पोळ्यांचे तळलेले तुकडे घालावेत . मीठ , चाट मसाला , उकडलेले हरबरे आणि थोडं तिखट घालावं .
• दही घालावं आणि सगळं व्यवस्थित कालवून घ्यावं एका वरून बारीक शेव , खारे शेंगदाणे , कोथिंबीर घालून खायला दयावं . तुमची कल्पनाशक्ती वापरून तुम्ही हा पदार्थ आणखीन पौष्टिक करू शकाल.
Leave a Reply