चटकदार मिसळ

चटकदार मिसळ

साहित्य

• मोड आलेले धान्य पाव किलो
• दोन बटाटे , तीन मोठे कांदे
• चार ते पाच हिरव्या मिरच्या
• एक वाटी ओल्या नारळाचा चव
• दीड वाटी चिरलेली कोथिंबीर
• तिखटपूड , हिंग , दोन लिंबू
• मोहरी , हळद , दोन टोमाटो
• कढीपत्ता दहा ते बारा पाने
• आले-लसूण पेस्ट एक चमचा
• फरसाण व शेव १२५ ग्रॅम
• चवीनुसार मीठ , तेल .

कृती

• मोड आलेले धान्य थोडेसे भाजून घ्यावेत . बटाटा , टोमाटो , कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे . लिंबू चिरून ठेवावेत .

• पातेल्यात तेल टाकून त्यात मोहरी , जिरे , कढीपत्ता , मिरची , हळद , तिखटपूड , आले-लसूण पेस्ट टाकावी .

• नंतर त्यात बटाटा , टोमाटो टाकून मोड आलेले धान्य टाकून दोन मिनिटे ढवळत राहावे . हवे असेल तेवढे गरम पाणी टाकून शिजवावे .

• सर्व्ह करताना वरून कोथिंबीर , शेव , कांदा व फरसाण टाकून ब्रेडसोबत खाण्यास दयावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.