
खडा मसाला मटण
साहित्य
• ५०० ग्रा. मटण
• ५ मोठे चमचे तेल
• २ कापलेले कांदे
• १ चमचा किसलेले आले
• ४ कळी कापलेली लसुण
• ६ लाल मिरची
• ३ मोठी विलायची
• २ तुकडे दालचिनी
• ६ काळी मिर्च दाणे
• ३ लवंग
• १॥ चमचा मीठ चवीनुसार
• २॥ कप पाणी
• २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
• १/२ कप कापलेली कोथंबीर
कृती
• तेल गरम करून कांद्यास लालसर भाजावे. नंतर आले व लसूण टाकून २ मिनीट फ्राय करावे.
• लाल मिरचीचे दोन तुकडे करावे व विलायची, दालचिनी, काळी मिर्च, लवंग व मीठाबरोबर टाकावे.
• मटण टाकावे व ५ मिनीटे फ्राय करावे. नंतर पाणी टाकुन कमी गॅसवर ३५-४० मिनीटे शिजवावे.
• जेव्हा मटण शिजेल आणि पाणी आहे तेव्हा कोथंबीर व हिरवी मिरची टाकावी, तेल सोडेपर्यंत शिजवावे नंतर सर्व्हिंग डिशमध्ये काढुन नान किंवा भाताबरोबर गरम गरम करावे.
Leave a Reply