कोलंबीचे पॅटीस

कोलंबीचे पॅटीस

साहित्य

• १ वाटी साफ केलेली कोलंबी
• २ मध्यम कांदे
• १ वाटी ओले खोबरे
• १ कोथिंबीरीची जुडी
• २ टोमाटो
• १ चमचा धनेपूड
• तिखट
• मीठ
• हळद
• तेल

कव्हर :

• १/२ किलो बटाटे
• थोडे तिखट
• मीठ
• मिरपूड

कृती

• कोलंबी स्वच्छ धुऊन बारीक चिरावी आणि तिला हळद व मीठ लावावे.

• थोड्या तेलावर कांदा परतून घ्यावा. कांदा बदामी रंगाचा झाला कि त्यात धनेपूड टाकून जरा परतावे.

• एक पाण्याचा हबका द्यावा म्हणजे खमंग वास येईल.

• त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालून जरा परतून चिरलेली कोलंबी घालावी.

• नंतर त्यावर झाकण ठेवून कोलंबी चांगली शिजू द्यावी. कोलंबी शिजली कि पाणी आटवून घ्यावे.

• त्यात तिखट, मीठ, ओले खोबरे घालावे.

• भाजी कोरडी झाली कि खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.

• बटाटे उकडून घ्यावेत व गरम असतानाच मळावेत.

• त्यात थोडे तिखट, मीठ, मिरपूड व १ चमचा कॉर्नफ्लोअर घालावे.

• त्याचे बेताच्या आकाराचे गोळे करून पारया करून त्यात सारण भरून पॅटीस करावे.

• नंतर रव्यात घोळवून उथळ तव्यावर थोडे तेल घालून तळावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.