कोथिंबीर धिरडं

कोथिंबीर धिरडं

साहित्य

• एक वाटी ज्वारीचं पीठ
• अर्धी वाटी बेसन
• एक मोठा चमचा रवा
• दोन वाटया चिरलेली कोथिंबीर
• अर्धी वाटी ताक
• अर्धी वाटी पाणी
• थोडं लाल तिखट
• अर्धा चमचा जिरं
• चवीनुसार मीठ .

कृती

• धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा . सर्व साहित्य एकजीव करून घ्याव्यात .

• तवा तापला की नारळाची शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं . जेणे करून धिरडी चिकटणार नाही .

• एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं . चर्र आवाज आला की धिरडं उलटावं .

• नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला . एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.