
कोथिंबीरीचे वडे
साहित्य
• २ जुड्या कोथिंबीर
• ७-८ हिरव्या मिरच्या
• ५-६ लसूण पाकळ्या
• १ इंच आले बारीक वाटून
• १ वाटीभर डाळीचे पीठ
• २ टेबलस्पून बारीक रवा
• मीठ
• १ चिमूट खायचा सोडा
• तळण्याकरता तेल
कृती
• कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे.
• एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे.
• कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळावेत.
Leave a Reply