
कुल्फी
साहित्य :
दूध एक लिटर
कॉर्नफ्लोअर किंवा कस्टर्ड पावडर
दोन तीन चमचे
साखर एक वाटी
बदामांची भरड अर्धी वाटी
चार पाच वेलदोड्यांची पूड
थोडं केशर
कृती:
जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळायला ठेवावं.
पाऊण लिटर राहिलं की, साखर घालून आणखी पाच मिनिटं उकळावं, बदामांची भरड व वेलदोड्यांची पूड घालावी.
पाव वाटी दुधात कॉर्नफ्लोअर किंवा कस्टर्ड पावडर कालवावी आणि उकळत्या दुधात घालून ढवळत राहावं. दूध घट्ट होऊ लागलं की आणखी चार-पाच मिनिटं उकळून गॅस बंद करावा. गार झाल्यावर कुल्फीच्या मोल्डस्मध्ये भरून डीपफ्रीजरमध्ये ठेवावं.
Leave a Reply