
काबुली चण्याचा चटका
साहित्य
• २ वाट्या शिजलेले चणे
• ३ लिंबे (रस)
• ४ चमचे भाजलेल्या तिळाची पूड
• २ चमचे तिळाचे तेल किंवा रिफाईंड तेल
• २-३ लसूण पाकळ्या
• अर्धा चमचा मीठ
कृती
• १ वाटी काबुली चणे आदल्या रात्री भिजत टाकावेत. दुसर्या दिवशी किंवा १०-१२ तासानंतर निथळावे व दुसरे पाणी व मीठ घालून कुकरमध्ये शिजवावे.
• काबुली चणे डब्यातले वापरल्यास ही खिटखिट करावी लागत नाही.
• लिंबाचा रस काढावा. लसूण पाकळ्या वाटाव्या. सर्व जिन्नस मिक्सरमधे घालावेत व मिश्रण एकजीव होईपर्यंत मऊ वाटून घ्यावे.
• लहान वाडग्यात झाकून ठेवावे व गार करावे. एका डिन्नर प्लेटमध्ये गाजरे, मुळा, काकड्या, पातीचे कांदे, कॉलीफ्लॉवरचे अर्धवट उकडलेले तुरे अशा भाज्याचे उभट लांबट तुकडे मांडावे, मध्यभागी छोट्या वाटीत किंवा बोलमध्ये हा चटका ठेवावा.
Leave a Reply