कांद्याच्या पातीचा झुणका

कांद्याच्या पातीचा झुणका

साहित्य

• कांद्याची पात एक जुडी
• हरभरा डाळीचं पीठ एक वाटी
• हळद अर्धा चमचा
• मिरची पावडर एक चमचा
• तेल पळीभर
• जिरं एक चमचा
• मोहरी , पाणी
• चवीनुसार मीठ

कृती

• कांद्याच्या पातीपासून कांदे वेगळे काढावेत . पात स्वच्छ धुवून चिरून घ्यावी .

• त्यामध्ये डाळीचं पीठ , तिखट , मीठ घालून एकत्र करावं . जिरं-मोहरीची फोडणी करावी .

• मग एकत्र केलेलं पात आणि पीठ टाकावं . अर्धा कप पाण्याचा हबका मरवा . अलगद मिश्रण हलवावं .

• झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ दयावी . मग परत हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता झुणका होऊ दयावा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.