

साहित्य:
एक वाटी बासमती तांदूळ, पाव किलो ओले काजू, नारळाचं दूध एक वाटी, साखर पाव वाटी, एक मोठा डाव तूप, दहा-बारा मिरी दाणे, मीठ, बेदाणे वीस-पंचवीस.
कृती:
प्रथम तांदूळ धुऊन ठेवावेत. नंतर तुपावर मिरी दाणे घालून तांदूळ,
ओले काजू सोलून परतून घ्यावेत आणि आधणाचं पाणी, नारळाचं दूध घालून भात शिजवून घ्यावा.
भातात पाणी कमी घालावं. कारण नारळाचे दूध घालायच असतं.
चवीला मीठ आणि साखर घालावी.
भात शिजल्यावर कडेने साजूक तूप सोडावे.
भात शिजत आल्यावर बेदाणे न तळताच भातात घालावे.
तयार आहे अप्रतिम चवीचा ओल्या काजूचा भात
Leave a Reply