उपवासाची बटाटा भाजी

उपवासाची बटाटा भाजी

साहित्य

• २ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
• १ टिस्पून साजूक तूप
• १/२ टिस्पून जिरे
• ३-४ हिरव्या मिरच्या
• २ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
• १ टिस्पून लिंबाचा रस
• १/२ ते १ टिस्पून साखर
• चवीपुरते मिठ

कृती

• बटाटे शिजवून घ्यावेत. बटाटे सोलून त्याच्या मध्यम फोडी कराव्यात.

• कढईत १ टिस्पून तूप गरम करावे. त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. यात बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर परतावे. चवीपरते मिठ आणि साखर घालावी, दाण्याचा कूट घालावा. झाकण ठेवून वाफ काढावी. • २-३ मिनीटांनंतर त्यात लिंबू रस घालून मिक्स करावे.

टीप:

• आवडीनुसार ताजा ओला नारळही घालू शकतो.

उपवास नसेल तरीही खाऊ शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.