
उन्हाळी काकडी भात
साहित्य :
एक वाटी तांदळाचा शिजवलेला भात
दोन मोठ्या काकड्या खिसुन
सायीचं दही दीड वाटी
जरूरीनुसार दूध
मीठ-साखर
आल्याचा कीस एक चमचा
दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कढीपत्ता
कोथिंबीर
तेल
फोडणीचं साहित्य.
कृती:
भातात दही, दूध, साखर, मीठ आणि आल्याचा कीस घालून कालवावं.
तेलात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून ती फोडणी भातात घालावी.
शेवटी काकडी आणि कोथिंबीर घालून भात वाढावा.
Leave a Reply