इडली रवा खांडवी
साहित्य
• १/२ कप इडली रवा
• १/२ कप गूळ
• १ कप पाणी (टीप)
• २ चमचे तूप
• १/२ टिस्पून वेलचीपूड
• १/४ कप ओलं खोबरं
कृती
• तूपावर इडली रवा गुलाबीसर रंगावर भाजून घ्यावा. १ कप पाणी उकळवावे आणि भाजलेल्या रव्यात घालावे. १ वाफ काढावी.
• वाफ काढून झाली कि त्यात नारळ, वेलचीपूड आणि गूळ घालावा व परत १-२ वेळा वाफ काढावी. थाळीला तूपाचा हात लावून घ्यावा. खांडवीचे मिश्रण थाळीत ओतून थापून घ्यावे. व वड्या पाडाव्यात.
Leave a Reply