अंडा करी

अंडा करी

साहित्य

• २ उकडलेली अंडी (कवच काढून)
• २ उकडलेले बटाटे, टोमॅटो
• कांद्याची पेस्ट, आल-लसून पेस्ट
• १/४ टीस्पून साखर, १/४ कप दुध
• १/२ टीस्पून जीरे, २ लवंग
• १/४ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर
• १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून धणे- जिरे पूड
• १/२ टीस्पून गरम मसाला पावडर, ६ काजू
• १/२ टीस्पून किचन किंग मसाला,
• १/२ टीस्पून खसखस, २ टीस्पून तूप,
• १ पेजपण, १/२ कांडी दालचिनी, मीठ चवीनुसार.

कृती

• काजू गरम पाण्यात थोडया वेळ भिजवत ठेवा. नंतर काजू आणि खसखसची पेस्ट करून घ्या.

• एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात पेजपान, लवंग, दालचिनी आणि जीरे टाका.

• जीरे तडतडलायला लागल्यावर त्यात आल-लसून पेस्ट, कांद्याची पेस्ट टाका. कांदा तेलात गुलाबी होई पर्यत परता.

• नंतर त्यात टोमॅटो पेस्ट, हळद, धन-जीरपूड, काश्मिरी मिरची पावडर, किचन किंग मसाला,साखर टाका.झाकण ठेवून एक वाफ आणा.

• मिश्रणाला तेल सुटले कि त्यात काजू-खसखस पेस्ट, मीठ, गरम मसाला, दुध टाका.

• २ मिनिटांनी त्यात अंडी(अंड्यांना मध्ये काप दया), बटाटे घाला आणि आवश्यक असल्यास पाणी घाला. उकळी आल्यावर आच घालवा.

• आता त्यावर तूप सोडा आणि कोथिबीरने सजवा.

• चपाती/रोटी/भाता सोबत सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.